केडगाव : ( योगेश गुंड ) माजी महापौर संदिप कोतकर यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या नगर शहर मतदार संघात आमदार संग्राम जगताप यांनी ...
केडगाव : ( योगेश गुंड )
माजी महापौर संदिप कोतकर यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या नगर शहर मतदार संघात आमदार संग्राम जगताप यांनी २ हजार ९७३ मतांची निर्णायक आघाडी घेतली .केडगावमधुन काय होते म्हणुन टेशंनमध्ये असलेल्या जगताप समर्थकांना यामुळे दिलासा मिळाला आहे .
नगर शहर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि माजी महापौर संदिप कोतकर यांच्या स्पंदन प्रतिष्ठानने नगर शहरातुन गणेश विसर्जन मिरवणूक काढत मोठे शक्तिप्रदर्शन केले . हे शक्तिप्रदर्शन विधानसभा लढवण्यासाठी होते हे निश्चित झाले .यानंतर उद्योजक सचिन कोतकर यांनी केडगावमध्ये मोठे शक्तिप्रदर्शत करीत निवडणूक लढवण्याबाबत मेळावा घेतला . कोतकर समर्थकांनी निवडणूक लढवण्यासाठी हिरवा कंदिल दाखवताच सचिन कोतकर यांनी नगर शहराच्या मैदानात दंड थोपटले .कोतकर यांना महाआघाडीकडुन तुतारी किंवा मशाल मिळेल अशी शहरात चर्चा सुरू झाली . कोतकर मैदानात उतरत असल्याने नगर मधील शिवसेना व राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) घाळ झाले .
शेवटपर्यंत कोतकर यांच्या उमेदवारीची शहरात चर्चा झाली . अनेकांनी त्यांच्या उमेदवारीचा धसका घेतला . शहरातील महाआघाडीने कोतकर यांना उमेदवारी मिळू नये म्हणुन पक्षांच्या वरिष्ठांना पत्रव्यवहार केला . तरीही केडगावसह नगर शहरात केडगावची चर्चा सुरूच होती .
शेवटी माजी महापौर संदिप कोतकर यांची एका प्रकरणात जिल्हा बंदी शिथिल झाली . ते नगर मधे आले तेव्हा त्यांचे जंगी स्वागत झाले . पण एका प्रकरणात त्यांची जिल्हा बंदी नाकारण्यात आली . त्यातच मिरवणुकीत झालेल्या गडबडीवरून सुमारे २०० कोतकर समर्थकांवर गुन्हे दाखल संदिप कोतकर यांच्या उमेदवारीची आशा मावळली मात्र ऐनवेळी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत नगरच्या राजकारणात नवा ट्विस्ट दिला .नंतर त्यांनी तो अर्ज मागे घेतला आणि जगताप समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला .
नगर शहरात एकतर्फी निवडणुक होईल असे चित्र असताना शेवटच्या चार - पाच दिवस आधी कोतकर यांच्याकडुन शहरात तुतारी चालवण्याचे आदेश निघाले अशी चर्चा सुरू झाली . यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक अचानक नव्या वळणावर आली . अनेक कोतकर समर्थक शेवटी अभिषेक कळमकर यांच्या प्रचार फेरीत मैदानात उतरले .केडगावच्या इतिहासात प्रथमच माजी नगरसेवक दिलीप सातपुते समर्थक व कोतकर समर्थक संग्राम जगताप यांच्या पराभवासाठी एकत्र आले . यामुळे सावध होत जगताप यांनी आपली योग्य चाल खेळली .
मात्र मतदानाच्या दिवशी कळमकर यांची यंत्रणा बेसावध राहिली .
शेवटी केडगावमधे झालेल्या २० हजार ३ मतापैकी संग्राम जगताप यांना १० हजार ९५२ मते मिळाली तर कळमकर यांना ७ हजार ९७८ मते मिळाली .केडगावमधुन जगताप यांना २ हजार ९७३ मतांची आघाडी मिळाली .
COMMENTS