केडगाव : ( योगेश गुंड ) आमदारकीची जोरदार हॅटट्रीक मारणाऱ्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातील विजेते संग्राम जगताप यांना पहिल्याच शपथविधीत मंत...
केडगाव : ( योगेश गुंड ) आमदारकीची जोरदार हॅटट्रीक मारणाऱ्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातील विजेते संग्राम जगताप यांना पहिल्याच शपथविधीत मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडुन समजली.
नगर शहरात महापौर म्हणुन जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेल्या संग्राम जगताप यांना २०१४ मध्ये राष्ट्रवादीने विधानसभेची पहिल्यांदा संधी दिली . यावेळी २५ वर्ष नगर शहराचे आमदार असणाऱ्या स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा त्यांनी अवघ्या ३ हजार मतांनी पराभव करीत आमदारकीवर मोहोर उमठवली .यानंतर पुन्हा २०१९ मध्ये त्यांना पुन्हा राष्ट्रवादीने संधी दिली . पुन्हा त्यांची लढाई राठोड यांच्याशीच झाली . यावेळी त्यांनी तब्बल ११ हजार मतांनी विजय मिळवला होता. यावेळी राष्ट्रवादीत फुट पडली . दोन राष्ट्रवादी एकमेंकासमोर मैदानात उतरल्या . तरीही जगताप यांनी ३९ हजार ६५० मतांची मोठी आघाडी घेत नगर शहराचे ' किंग ' आपणच असल्याचे सिध्द केले. अजितदादांना संकटाच्या काळात सर्वात पहिली जगताप यांनी त्यांना साथ दिली. त्याची बक्षिसी म्हणून जगताप यांना पहिल्याच खेपेला मंत्रीपद मिळणार असल्याचे अजितदादाच्या गटाकडुन आज स्पष्ट करण्यात आले .जगताप यांना मंत्रीपद मिळाले तर नगर शहरात तब्बल ३० वर्षानंतर नगरला लाल दिवा मिळणार आहे .
यापुर्वि स्व. अनिल भैया राठोड यांना १९९५ ते १९९६ या काळात राज्यमंत्रीपद मिळाले होते . तेव्हापासुन नगर शहर लाल दिव्याची प्रतिक्षा करीत होते . यावेळी संग्राम जगताप यांच्या रूपाने नगर शहराला मंत्री पद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत .
COMMENTS