केडगाव : वनसाईड वाटणारी नगर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणुक शेवटच्या क्षणात चुरशीची बनली आहे . केडगावच्या मताधिक्यामुळे आ. संग्राम जगताप ...
केडगाव : वनसाईड वाटणारी नगर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणुक शेवटच्या क्षणात चुरशीची बनली आहे . केडगावच्या मताधिक्यामुळे आ. संग्राम जगताप यांचा विधानसभेचा रस्ता सुकर बनला . यंदा मात्र केडगावमध्ये काही तरी वेगळं शिजण्याचा वास येत असल्याची चर्चा सुरू आहे .
महाआघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी ' केडगावकर म्हणतात यंदा तुतारीच ' असा फलक केडगाव वेशीच्या परिसरात लावल्याने त्याची केडगावमधे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे . सध्या माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांना मानणारी शिवसेना कळमकर यांच्या प्रचारात केडगावच्या मैदानात उतरली आहे . आता काही अज्ञात शक्ति केडगावमधुन तुतारी फुंकण्याचे आदेश देत असल्याची चर्चा सुरू आहे . मात्र याबाबत कोणीही उघड व स्पष्ट बोलायला तयार नाही. यामुळे केडगावमध्ये नेमकं काय शिजतंय आणि कळमकर असे का म्हणाले ' केडगावकर म्हणतात यंदा तुतारीच ' याचा अंदाज लागेना . मात्र याबाबत केडगावमध्ये दबक्या आवाजात खमंग चर्चा सुरू आहे .
COMMENTS