केडगाव : यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा, ता उमरी, जि. नांदेड यांच्यावतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य ...
केडगाव : यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा, ता उमरी, जि. नांदेड यांच्यावतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल राज्य स्तरीय लोकसवांद पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. यंदा दि. जानेवारी २०२५ रोजी श्री शाहू महाराज विदयालय भोकर (बोरगाव रोड) भोकर येथे हे संमेलन होणार आहे. २० व्या लोकसंवाद संमेलनात नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, आमदार हेमंतभाऊ पाटील, नायगावचे आमदार राजेश पवार व भैंसा विधानसभा तिलंगणाचे आमदार श्रीरामराव पाटील , शिरीषभाऊ गोरठेकर, संमेलनाध्यक्ष प्रा. महेशजी मोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. उद्योग व्यवसायात उल्लेखनीय कार्य किल्याबद्दल सौ.स्वाती सुधीर वायकर व श्रीमती सुवर्णा फरताळे संचालक महाष्ट्रातील पहिले नणंद भावजयीचे हॉटेल संजीवनीला उत्कृष्ट उद्योग व्यवसाय राज्यस्तरीय लोकसंवाद पुरस्कार २०२४चा जाहीर करण्यात आला आहे.
संमेल्लन सल्लागार समितीची इंजी. मिलींद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वरील पुरस्कारार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, महावस्त्र,सन्मानचिन्ह, गौरव पदक व रोख रक्कम, ग्रंथभेट व पुष्पहार असे आहे. या समितीत देविदास फुलारी, राम तरटे, प्रा धाराशिव शिराळे, निर्मल कुमार सुर्यवंशी, अॅड एल. जी. पुयड, सोपानराव लामकानीकर, नागोराव डोंगरे आदींनी निवड प्रक्रीया पूर्ण केले, अशी माहीती संयोजक ह दिगंबर कदम यांनी केली आहे. पुरस्कारार्थी नणंद भावजयीचे सोनेवाडी मेहेकरी परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.
COMMENTS