केडगाव : अहिल्यानगर बायपास मार्गावर नव्याने सुरू झालेल्या टोल वसुली वरून सध्या स्थानिक वाहनधारक व टोल व्यवस्थापक कर्मचारी यांच्यात रोज खटके...
केडगाव : अहिल्यानगर बायपास मार्गावर नव्याने सुरू झालेल्या टोल वसुली वरून सध्या स्थानिक वाहनधारक व टोल व्यवस्थापक कर्मचारी यांच्यात रोज खटके उडत आहेत. टोलवसुलीतुन स्थानिक वाहनधारकांना सुट मिळावी अन्यथा टोल वसुली नाक्यावर स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा नगर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी दिला आहे.
याबाबत उपमहाप्रबंधक धनु श्री झोडगे यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, नगर शहर बाहयवळण रस्त्यावर असणारा टोल नाका संबंधित ठेकेदार कंपनीने कुठलीही जाहीर सूचना न देता अचानक सुरु करून टोल नाक्यावरील वसूली चालू केली आहे. टोल वसूली बाबत हरकत नाही ,परंतु स्थानिक नागरिकांना यातून वगळले जावे अशी आमची हक्काची मागणी आहे. या मुद्द्यावरुन टोल नाक्यावर वारंवार वाद होत आहेत. टोलवरुन मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी मालवाहतुक, दूधव्यावसायिक वाहने, इतर ट्रांसपोर्ट व्यावसायिक नोकरदार वर्ग तसेच एमआयडिसी कामगार , नोकरदार दिवसातून अनेकदा बाह्यवळण मार्गावरू ये जा करत असतात. या सर्वांकडून टोल वसूली करणे अन्यायकारक आहे. सर्वाना वसूलीतुन वगळले जावे ही आमची मागणी असून त्यावर तत्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा स्थानिक नागरिकांच्या रोषाला कंपनीला सामोरे जावे लागेल आणि निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नास सदर कंपनी व प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा डॉ.पवार यांनी दिला आहे . यावेळी बाळासाहेब कोतकर उपस्थीत होते.
COMMENTS