केडगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगर शहरात आल्यानंतर त्यांनी बुऱ्हाणनगर येथे येऊन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थान...
केडगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगर शहरात आल्यानंतर त्यांनी बुऱ्हाणनगर येथे येऊन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
मुख्यमंत्री फडणवीस पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मुलाच्या विवाहासाठी नगर शहरात आज आले होते.विवाह सोहळ्यानंतर त्यांनी बुऱ्हाणनगर येथील आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कर्डिले व युवा नेते अक्षय कर्डिले यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , गिरीष महाजन , विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थीत होते. कर्डिले यांच्या परिवाराच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी नगर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थीत होते .
COMMENTS