केडगाव - गेल्या १५ वर्षांपासुन खासगी हेलिकॉप्टर घेण्याचे स्वप्न जेष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी आज पुर्ण केले. संकष्ट चतुर्थीच्या मुहुर्ताव...
केडगाव - गेल्या १५ वर्षांपासुन खासगी हेलिकॉप्टर घेण्याचे स्वप्न जेष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी आज पुर्ण केले. संकष्ट चतुर्थीच्या मुहुर्तावर हे हेलिकॉप्टर कोतकर यांच्या ताफ्यात दाखल झाले.
कोतकर परिवाराच्या वतीने त्याची विधिवत पुजा करण्यात आली. यावेळी कोतकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थीत होते.
पुर्विपासुन अलिशान गाड्या वापरण्याचा छंद असणाऱ्या जेष्ठ नेते भानुदास कोतकर यांना गेल्या १५ वर्षापासुन स्वःताचे खासगी हेलिकॉप्टर घेण्याचे स्वप्न होते. आज ते स्वप्न त्यांनी पुर्ण केले. कोतकर यांच्या परिवारातील अलिशान वाहनात आता सर्वात अलिशान असे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. यानिमित्ताने केडगावमधील अनेकांनी त्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. यावेळी माजी महापौर संदिप कोतकर , माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर , जिल्हा बँकेंच्या माजी संचालिका सुरेखा कोतकर , उद्योजक सचिन कोतकर , बाजार समितीच्या माजी संचालिका वैशाली कोतकर , उद्योजक अमोल कोतकर व परिवारातील इतर सदस्य उपस्थीत होते .
COMMENTS