सन १९८७ साली यरनाळ येथील शेतात ऊस लागण करताना पडलेली कै. शशिकांत रामचंद्र नेसरीकर रा. निपाणी यांच्या बोटातील सोन्याची अंगठी तब्बल ३८वर्षा...
सन १९८७ साली यरनाळ येथील शेतात ऊस लागण करताना पडलेली कै. शशिकांत रामचंद्र नेसरीकर रा. निपाणी यांच्या बोटातील सोन्याची अंगठी तब्बल ३८वर्षानी ...
. म्हणजे ४जानेवारी २०२५ ला त्याच रानात उसाची लागण करताना त्यांचे चिरंजीव चैतन्य शशिकांत नेसरीकर रा. निपाणी यांच्या पायातील चपलेत अडकून मिळाली.
इतक्या वर्षाच्या शेताच्या मशागती मुळे अंगठीतील खडा गायब असून अंगठी सुस्थितीत आहे
विशेष म्हणजे के शशिकांत नेसरीकर कामगारांबरोबर ऊस लागण करताना उसाच्या टिपऱ्या मातीत दाबताना अंगठी गहाळ झाली होती, काम संपल्या वर हातपाय धुताना अंगठी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले पण त्या रानात नक्की कधी व कुठे पडली याची खात्री नसल्याने नशिबाला दोष देऊन तें शेतातून घरी आले. पण त्या रानात तें ज्या ज्या वेळी जायचे त्या वेळी तिथं काम करणाऱ्या कामगारांना, रयताना "माझी अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी इथं पडले, मिळाली तर द्या हं " असं चेष्टेत म्हणायचे. मलाही त्यांनी हॆ सांगितलं होतं. मात्र
त्यांना २००४साली देवाज्ञा झाली.कष्टाची कमाई वाया जात नाही म्हणतात याचा परत एकदा प्रत्यय आला. देवावरील आणि दैवावरील विश्वासही दृढ झाला. एखाद्या रानात ३८ वर्ष इतके वातावरणाचे आघात सोसत, शेतातील मशागत,उंदीराची बिळे व कामगारांची नजर चुकवत माझ्या वडिलांची अनामत माझ्या चप्पलला रुतून मलाच मिळाली हॆ बघून मन सुन्न, स्तब्ध व गहिवरून आले अशी भावना चैतन्य नेसरीकर यांनी बोलून दाखवली.
COMMENTS