हिवरे बाजार :- नुकतेच लागोपाठ मागेपुढे १ महिनाभरात हिवरे बाजारचे ४ मल्लांचे वृद्धापकाळाने दुखद निधन झा...
हिवरे बाजार :- नुकतेच लागोपाठ मागेपुढे १ महिनाभरात हिवरे बाजारचे ४ मल्लांचे वृद्धापकाळाने दुखद निधन झाले. पैलवान ज्ञानदेव महादू ठाणगे (वय ९७ वर्षे), पैलवान विश्वनाथ विठोबा पादीर (वय ९७ वर्षे), रतन जानकू गोह्ड (वय ८० वर्षे) , पांडुरंग केसू पादीर (वय ९८ वर्षे ) एकेकाळी हिवरे बाजारच्या लालमातीची सेवा करून त्यांनी गावाचे कुस्तीक्षेत्रातील वैभव वाढविले.स्वातंत्र्यानंतरच्या या पिढ्यांनी कुस्ती क्षेत्रात राज्यभर हे मल्ल प्रसिद्ध होते.कै.बाबासाहेब पवार ,कै.बागुजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान मंड्याबापू कृष्णा चत्तर ,पै.रावसाहेब पवार,पै.अर्जुन नामदेव ठाणगे ,लक्ष्मण पवार ,जालिंदर चत्तर एक मोठी परंपरा हिवरे बाजारची कुस्ती क्षेत्रातील होती.एकाचवेळी १०० -१०० पैलवान कुस्ती आखाड्यात जायचे.त्यांच्या जाण्याने हिवरे बाजाचे कुस्तीक्षेत्रातील मोठे नुकसान झाले.त्यांच्या जाण्याने हिवरे बाजारचे वैभव गेले अशी भावना पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य व हिवरे बाजार ग्रामस्थांची झाली.
COMMENTS